शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन मुलाने दिला दहावीचा पेपर, बोर्डाने गावातच केली परीक्षेची सोय

By संदीप शिंदे | Updated: March 1, 2024 18:55 IST

गावातीलच केंद्रावर बोर्ड, शिक्षण विभागाने केली परीक्षेची सोय 

लातूर : दहावीची परीक्षा हा टप्पा जीवनात खूप महत्त्वाचा असतो. अशावेळी आपला आधारवडच हरपणे आणि तेही परीक्षेच्या आदल्या रात्री हे कठीणच. मात्र, अशा कठीण परिस्थितीतही अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील ऋषिकेश रामनाथ पुरी याने आपल्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी पित्याला साश्रुनयनांनी निरोप देत मराठीचा पेपर दिला. त्यामुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू तराळले होते. दरम्यान, परीक्षा केंद्र दुसऱ्या तालुक्यात असल्याने बोर्ड, शिक्षण विभागाने गावातीलच केंद्रावर परीक्षेची सोय केली होती.

अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील ऋषिकेश पुरी हा लातूर तालुक्यातील बोरी-सलगरा बु. येथे मामाकडे शिक्षणासाठी राहत असून, राजीव गांधी विद्यालयात शिकतो. दहावी परीक्षेसाठी बोरी येथील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयात त्याचा बैठक क्रमांक आला होता. मात्र, गुरुवारी सायंकाळी त्याचे वडील रामनाथ पुरी यांचे काम करताना अपघाती निधन झाले. ही वार्ता समजताच ऋषिकेशला मामासह ढाळेगावला जावे लागले. शुक्रवारी सकाळी १०:३० वाजता अंत्यविधी त्यात परीक्षा केंद्र मूळगावापासून १०० किलोमीटरवर असल्याने पेपर देता येणार नाही असाच समज होता. त्यात वडिलांच्या निधनामुळे ऋषिकेशही पेपर देण्याच्या मानसिक स्थितीत नव्हता. मात्र, नातेवाइकांनी ही बाब शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर लातूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग आणि गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांनी ऋषिकेशच्या घरी जाऊन सांत्वन करीत त्यास सर्व प्रकारची परवानगी मिळवून देत गावातीलच परीक्षा केंद्रावर त्याची परीक्षा देण्याची सोय केली. ऋषिकेशच्या कुटुंबात आई, छोटा भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.

वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन दिली परीक्षा...रामनाथ पुरी यांचे गुरुवारी सायंकाळी निधन झाल्यावर शुक्रवारी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. ऋषिकेश परीक्षा देण्याच्या मन:स्थितीत नव्हता. मात्र, लातूर विभागीय बोर्डाच्या अध्यक्षांनी त्याची घरी जाऊन भेट घेतली, सांत्वन केले. परीक्षा देण्यास त्याला तयार केले. सर्व प्रकारची परवानगी देत ढाळेगावातील माध्यमिक आश्रमशाळा या केंद्रावर परीक्षेची सोय केली. परीक्षेला जाताना वडिलांचे अंत्यदर्शन घेतले आणि तो परीक्षेला निघाला. यावेळी नातेवाइकांनी हंबरडा फोडला.

टॅग्स :laturलातूरssc examदहावीEducationशिक्षण