शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक वडिलांची भेट ठरली अखरेची; मुलीने हॉस्टेलवर जाऊन संपवले जीवन

By राजकुमार जोंधळे | Updated: March 21, 2024 19:45 IST

बीड जिल्ह्यातील वकीलवाडी (ता. केज) येथील रहिवासी असलेल्या एका शिक्षकाने आपल्या १७ वर्षीय मुलीला खाजगी शिकवणीसाठी लातुरातील एका वसतिगृहात ठेवले हाेते.

लातूर : इयत्ता ११ वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या आणि खाजगी शिकवणीसाठी लातुरात हाॅस्टेलमध्ये वास्तव्याला असलेल्या एका अल्पवयीन मुलीने वडिलांच्या भेटीनंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात बुधवारी घटनेची नाेंद करण्यात आली आहे.

पाेलिसांनी सांगितले, बीड जिल्ह्यातील वकीलवाडी (ता. केज) येथील रहिवासी असलेल्या एका शिक्षकाने आपल्या १७ वर्षीय मुलीला खाजगी शिकवणीसाठी लातुरातील एका वसतिगृहात ठेवले हाेते. दरम्यान, रविवारी सुटी असल्याने तिला भेटण्यासाठी ते लातुरात आले हाेते. मुलीला भेटून ते लातुरातील नातेवाइकांना भेटून येताे, असे मुलीला सांगत बाहेर पडले. वडील वसतिगृहाबाहेर पडल्यानंतर मुलीने राहत्या खाेलीतच गळफास घेऊन आत्महत्या केली. 

गावाकडे जाण्यापूर्वी मुलीला पुन्हा एकदा भेटून जावे, म्हणून ते रात्री उशिरा वसतिगृहावर आले. तिच्या खाेलीचे दार वाजविले. मात्र, आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. आतून दरवाजा लावून घेतल्याचे लक्षात आले. काही वेळानंतर खाेलीचा दरवाजा ताेडून काढला असता, मुलीने छताला गळफास घेतल्याचे आढळून आले. तिला तातडीने लातुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डाॅक्टरांनी तपासून तिला मृत घाेषित केले. याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीवरून शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात बुधवारी घटनेची नाेंद करण्यात आली आहे... 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर