जळकोट येथील बसस्थानकात प्रवाशांची परवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:38 IST2021-02-28T04:38:06+5:302021-02-28T04:38:06+5:30
जळकाेट येथे बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृह आणि हाॅटेलची ...

जळकोट येथील बसस्थानकात प्रवाशांची परवड
जळकाेट येथे बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृह आणि हाॅटेलची सुविधा उपलब्ध नाही. शिवाय, हे बसस्थानक सध्याला खासगी वाहनांसाठी पार्किंग परिसर झाला आहे. एस.टी. महामंडळाच्या बस या आता बसस्थानकात जात नाहीत. परिणामी, प्रवाशांना बसस्थानकासमाेर असलेल्या हॉटेल, दुकानांसमाेर थांबून बसची वाट पहावी लागत आहे. यातून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात हेळसांड हाेत आहे. सध्या कोराेनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, प्रवाशांना बस स्थानकात बसण्यासाठी जागा नाही. रात्रीच्या वेळी विजेची साेयही नाही. स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही, बसस्थानकामध्ये असलेले हॉटेल कुलूपबंद आहे. सध्या बसस्थानकाच्या समोर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने एसटी महामंडळाच्या बसही आता स्थानकात जात नाहीत. काही लोक बसस्थानकात बसून तर काही रस्त्यावर उभारून बसची वाट पहात आहेत. प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी खादर लाइटवाले, व्यंकटराव पवार, बालाजी आगलावे, गोपाळकृष्ण गबाळे, ॲड. तात्यासाहेब पाटील, काँग्रेसचे गटनेते माहिरू शेट्टी, अजीज मोमीन, रमाकांत रायवळ, माधव मुरली, सत्यवान पाटील दळवे, सरपंच सत्यवान चव्हाण आदींनी केली आहे.