जिल्ह्यात आयटीआयच्या ३ हजार ७०० जागांसाठी होणार प्रवेश प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:19 AM2021-07-26T04:19:27+5:302021-07-26T04:19:27+5:30

लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयटीआयची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. १५ जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तरी ...

Admission process will be held for 3,700 ITI seats in the district | जिल्ह्यात आयटीआयच्या ३ हजार ७०० जागांसाठी होणार प्रवेश प्रक्रिया

जिल्ह्यात आयटीआयच्या ३ हजार ७०० जागांसाठी होणार प्रवेश प्रक्रिया

googlenewsNext

लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयटीआयची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. १५ जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तरी दहावीचे गुणपत्रक मिळाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेला गती मिळणार आहे. जिल्ह्यात आयटीआयच्या ३ हजार ७०० जागा असून, इलेक्ट्रिकल, टर्नर, फिटर या ट्रेडला विद्यार्थ्यांची पसंती आहे.

जिल्ह्यात ११ शासकीय, तर ८ खाजगी आयटीआयची संख्या आहे. शासकीयमध्ये २४००, तर खाजगीमध्ये १४०० जागा आहेत. दोन वर्षांचा अभ्यासक्रम केल्यानंतर औद्योगिक क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी असल्याने विद्यार्थ्यांचा कल आयटीआयकडे वाढत आहे. १५ जुलैपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तरी विद्यार्थ्यांना गुणपत्रक मिळालेले नाही. त्यामुळे गुणपत्रक मिळाल्यानंतर आयटीआय प्रवेशाला सुरुवात होईल, असे औद्योगिक प्रशिक्षक संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

जिल्ह्यातील एकूण जागा - ३,७००

संस्था - शासकीय - ११

खाजगी - ८

संस्थानिहाय जागा - शासकीय - २४००

खाजगी - १४००

विद्यार्थी म्हणतात...

कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द झाली. त्यामुळे निकालास उशीर झाला. अजूनही गुणपत्रक मिळालेले नाही. त्यामुळे आयटीआयचा अर्ज भरलेला नाही. इलेक्ट्रिशियन किंवा टर्नर आणि फिटर या ट्रेडला प्रवेश घेण्याची इच्छा आहे. गुणवत्ता यादी जाहीर झाल्यावरच प्रवेशाचे चित्र कळेल. - बालाजी जाधव

आयटीआय दोन वर्षांचा असून, औद्योगिक क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी आहेत. सोबतच इलेक्ट्रिशियन आणि वायरमनचा कोर्स केल्यास महावितरणमध्ये नोकरी करता येते. त्यामुळे आयटीआयला प्रवेश घेण्याचे निश्चित केले आहे. अर्ज भरला असून, गुणवत्ता यादी कधी लागणार याची प्रतीक्षा आहे. - संकेत शिंदे

विद्यार्थ्यांचा कल आयटीआयकडे...

गेल्या काही वर्षांत औद्योगिकसह महावितरणमध्ये सेवेची संधी मिळत असल्याने विद्यार्थ्यांचा ओढा आयटीआयकडे अधिक आहे.

५० ते ८० टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेकडे जाण्यापेक्षा आयटीआयला पसंती देत असल्याचे चित्र आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची यामध्ये सर्वाधिक संख्या आहे. तालुकास्तरावरील आयटीआयमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रयत्न असतात.

इलेक्ट्रिशियनला पसंती...

आयटीआय अभ्यासक्रमामध्ये विविध कोर्सचा समावेश असून, दोन वर्षांचा अभ्यासक्रमाचा कालावधी आहे.

इलेक्ट्रिशियन, टर्नर, फिटर, वायरमन, डिझेल मेकॅनिक, कारपेंटर आदी कोर्सला विद्यार्थ्यांची पसंती आहे.

दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर नोकरीची हमी असल्याने आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये कॅम्पस मुलाखती होतात. त्यामध्ये नामांकित कंपन्या येतात. गुणवंतांना तत्काळ नोकरी मिळत असल्याने आयटीआयमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी इच्छुक असतात.

Web Title: Admission process will be held for 3,700 ITI seats in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.