सेवालयातील १३ मुलांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:26 IST2021-02-05T06:26:09+5:302021-02-05T06:26:09+5:30
लातूर : हासेगावच्या माळरानावर साकारलेल्या सेवालयातील १३ मुलांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश मिळाला असून, आता ही मुलं व्यावसायिक अभ्यासक्रम ...

सेवालयातील १३ मुलांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश
लातूर : हासेगावच्या माळरानावर साकारलेल्या सेवालयातील १३ मुलांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश मिळाला असून, आता ही मुलं व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करून स्वत:च्या पायावर उभी राहणार आहेत. प्रा. रवी बापटले यांनी २००७मध्ये सेवालय स्थापित केले. सध्या या सेवालयात ८५ मुले-मुली असून, त्यांचे पालक म्हणून प्रा. बापटले जबाबदारी पेलत आहेत. सेवालयाच्या प्रारंभापासून आलेली संकटे, अडथळे यावर मात करून त्यांनी या मुलांना शिक्षणही दिले आहे. आता या सेवालयातील १३ मुले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत आहेत. गत आठवड्यापासून या मुलांचे नियमित वर्ग सुरू झाले आहेत. त्यांना लातूरला पाठवायचे कसे, हा प्रश्न होता. स्कूल बस मुलांसाठी गरजेची होती. परंतु, अडचणी असल्याने ते शक्य झाले नाही. सेवालयातील ट्रॅक्टर रिकामा आहे, तो घेऊन जाता येईल, असा विचार पुढे आला. लागलीच मुलांनी ट्रॅक्टरची छोटी-मोठी वेल्डींगची कामे पूर्ण करून ट्रॅक्टरला सजवले. या ट्रॅक्टरनेच सेवालयातील मुले लातूरला आली. स्कूल बससाठी यापूर्वी एक-दोनवेळा प्रयत्न झाले. परंतु, पुरेसे पैसे गोळा झाले नाहीत. कोरोना काळात हे शक्य झाले नाही. समाजाच्या मदतीतून व लोकसहभागातून हे काम पुढे चालले असून, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सेवालयातील १३ मुलांना प्रवेश मिळाल्याने त्यांची स्वप्नपूर्तीकडे वाटचाल सुरू असल्याचा आनंद प्रा. रवी बापटले यांनी व्यक्त केला.