प्रशासकीय सेवा हे समाजसेवेचे साधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:15 IST2021-06-06T04:15:17+5:302021-06-06T04:15:17+5:30
बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट, लातूर यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तत्त्वज्ञानी बुद्ध यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने आयोजित ...

प्रशासकीय सेवा हे समाजसेवेचे साधन
बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट, लातूर यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तत्त्वज्ञानी बुद्ध यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने आयोजित ऑनलाइन व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी मुख्य संयोजक तथा ट्रस्टचे सचिव भन्ते पय्यानंद, सहसंयोजक डॉ. दुष्यंत कटारे, प्रा. देवदत्त सावंत यांची उपस्थिती होती. ई.झेड. खोब्रागडे म्हणाले, प्रशासकीय कार्य करताना केंद्रस्थानी व्यक्तीचे कल्याण आणि त्यांचा विकास ही भावना असली पाहिजे. भारतीय संविधानाच्या केंद्रस्थानी व्यक्ती आणि व्यक्तिमत्त्व असल्याचे आपणास दिसते. समाजातील लोकांना जगण्याच्या तत्त्वज्ञानाची माहिती असते. त्यामुळे समाजातील लोकांच्या व्यथा, समस्या आणि अडचणी समजून घेऊन कर्तव्य भावनेने त्या सोडविण्याचे कार्य प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. प्रशासकीय कार्य करीत असताना समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करणे गरजेचे आहे. भारतीय संविधान हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्थेतील प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षकांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.