मंगरुळच्या पाणी पुरवठ्यासाठी सव्वा कोटीस प्रशासकीय मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:19 IST2021-05-14T04:19:31+5:302021-05-14T04:19:31+5:30
उन्हाळा सुरू झाला की मंगरुळ येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. दरवर्षी उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा केला जातो. ही बाब ...

मंगरुळच्या पाणी पुरवठ्यासाठी सव्वा कोटीस प्रशासकीय मंजुरी
उन्हाळा सुरू झाला की मंगरुळ येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. दरवर्षी उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा केला जातो. ही बाब लक्षात घेऊन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जल जीवन मिशनअंतर्गत ३ कि.मी. दूर असलेल्या डोंगरकोनाळी प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. १ कोटी २४ लाखांच्या या जलयोजनेला प्रशासकीय मान्यता मिळवून दिली आहे. त्यामुळे मंगरूळ गावच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या पुढाकारामुळे काही महिन्यांपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले.
आमच्या गावातील पाण्याचा प्रश्न गंभीर होता. दरवर्षी टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत होता. त्यामुळे नागरिकांना त्रास होत होता. आता जलयोजना मंजूर झाल्याने ही समस्या दूर होणार आहे, असे सरपंच महेताब बेग यांनी सांगितले.