प्रशासन बेफिकीर, नागरीकांचा निष्काळजीपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:34 IST2021-02-18T04:34:46+5:302021-02-18T04:34:46+5:30
सध्या जिल्ह्यात ३१३ रुग्ण उपचाराधीन आहेत. यात ११७ होमआयसोलेशनमध्ये तर उर्वरित विविध कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. जिल्ह्यात ...

प्रशासन बेफिकीर, नागरीकांचा निष्काळजीपणा
सध्या जिल्ह्यात ३१३ रुग्ण उपचाराधीन आहेत. यात ११७ होमआयसोलेशनमध्ये तर उर्वरित विविध कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. जिल्ह्यात पहिला रुग्ण एप्रिल (२०२०) महिन्यात आढळला होता. एप्रिल ते सप्टेंबर महिन्यापर्यंत रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत गेली. ऑक्टोबर महिन्यापासून रुग्णसंख्या घटत आली आहे. सप्टेंबर महिन्यात ९ हजार १८८ रुग्ण आढळले होते. तर ऑक्टोबरमध्ये ३ हजार २२, नोव्हेंबर १ हजार ५५५, डिसेंबर १ हजार १५०, जानेवारी १ हजार १९५ आणि चालू फेब्रुवारी महिन्यामध्ये गेल्या १७ दिवसांत ४६१ रुग्ण आढळले आहेत. सध्याचा पॉझिटिव्हीटी रेट ३.५ आहे. तर गेल्या वर्षात सप्टेंबर महिन्यातील पॉझिटिव्हीटी रेट २३.५ टक्के होता.
दंडात्मक कारवाई शुन्य...
अनलॉक झाल्यानंतर नागरिक रस्त्यावर येऊ लागले. सार्वजनिक व कामाच्या ठिकाणी फिजीकल डिस्टन्स पाळले गेले. प्रारंभी प्रशासनाने या नियमांची प्रभावी अंमलबजावणी केली. मास्क व फिजीकल डिस्टन्सचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई केली. महानगरपालिकेने मास्क न वापरणा-या व फिजीकल डिस्टन्सचे पालन न करणा-या व्यावसांयिकांकडून लाखोंचा दंड वसूल केला. मात्र, कारवाई शिथील झाल्यानंतर नागरिकांचा निष्काळजीपणा वाढला आहे. हॉटेल, सरकारी कार्यालये व सार्वजनिक ठिकाणी फिजीकल डिस्टन्सचे पालन होताना दिसत नाही.
जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात...
जिल्ह्यात सद्यस्थितीत ३१३ रुग्ण ॲक्टीव्ह आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात २ लाख १२ हजार ८१ चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यात २४ हजार ६८२ रुग्ण आढळले आहेत. यातील २३ हजार ६७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ६९२ जणांचा मृत्यूू झाला आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. सध्याचा पॉझिटिव्हीटी रेट ३.५. ते ४ टक्के आहे. पुर्वी हा रेट२३ टक्क्यांवर होता. परंतू, राज्यातील इतर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने खबरदारी घेणे गरजेचे आहे.