जिल्ह्यात आणखी १२१७ रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:32 IST2021-05-05T04:32:50+5:302021-05-05T04:32:50+5:30

दरम्यान, बाधित असलेल्या ११ हजार ६०१ रुग्णांपैकी ८७८ रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. ८० रुग्ण गंभीर मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर आहेत, तर ३६४ ...

Addition of another 1217 patients in the district | जिल्ह्यात आणखी १२१७ रुग्णांची भर

जिल्ह्यात आणखी १२१७ रुग्णांची भर

दरम्यान, बाधित असलेल्या ११ हजार ६०१ रुग्णांपैकी ८७८ रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. ८० रुग्ण गंभीर मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर आहेत, तर ३६४ रुग्ण गंभीर बीआयपीएपी व्हेंटिलेटरवर आहेत. १९५१ रुग्ण ऑक्सिजनवर परंतु मध्यम लक्षणाचे आहेत. ६२६ रुग्ण मध्यम, परंतु विनाऑक्सिजनवर आहेत, तर तब्बल ८५८० रुग्ण सौम्य लक्षणाचे असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून सांगण्यात आले. ११ हजार ६०१ रुग्णांपैकी ४ हजार १९२ रुग्ण विविध कोविड केअर सेंटर व दवाखान्यात आहेत, तर ७ हजार ४०९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.

१ हजार ३७४ रुग्णांना सुट्टी

प्रकृती ठणठणीत झाल्याने १३७४ जणांना मंगळवारी सुट्टी देण्यात आली. त्यात होम आयसोलेशनमधील १००४ रुग्णांचा समावेश आहे. सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधील २२, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील १६५, दापका कोविड केअर सेंटरमधील २०, लाहोटी तंत्रनिकेतनमधील ४०, समाजकल्याण हॉस्टेल कव्हा रोड येथील ३०, ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथील २, देवणी येथील २, किल्लारी येथील एक, मुलांचे शासकीय निवासी शासकीय शाळा औसा येथील ६, कृषी पीजी कॉलेज येथील ८, बावची कोविड केअर सेंटर येथील ७ अशा एकूण १३७४ जणांनी कोरोनावर मात केली.

Web Title: Addition of another 1217 patients in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.