जिल्ह्यात ६०१ बाधित रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:19 IST2021-05-13T04:19:57+5:302021-05-13T04:19:57+5:30

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत बुधवारी १६९५ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ३०३ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह ...

Addition of 601 infected patients in the district | जिल्ह्यात ६०१ बाधित रुग्णांची भर

जिल्ह्यात ६०१ बाधित रुग्णांची भर

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत बुधवारी १६९५ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ३०३ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे, तर २ हजार १०५ जणांची रॅपिड अँटिजन चाचणी करण्यात आली. त्यामध्ये २०८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रॅपिड आणि प्रयोगशाळेतील चाचणी असे दोन्ही मिळून ६०१ नव्या बाधित रुग्णांची भर पडली आहे. सद्यस्थितीत ९ हजार ५६८ जणांवर उपचार सुरू असून, यापैकी ५ हजार ९१४ रुग्ण होमआयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात १ हजार २२ जणांची प्रकृती ठणठणीत झाल्याने रुग्णालय प्रशासनाच्या वतीने त्यांना सुटी देण्यात आली. यामध्ये होमआयसोलेशनमधील ८१९ जणांचा समावेश आहे. दरम्यान, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.१० टक्क्यांवर पोहचले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: Addition of 601 infected patients in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.