जिल्ह्यात आणखी १६६८ रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:19 IST2021-04-22T04:19:51+5:302021-04-22T04:19:51+5:30
बुधवारी १६०५ जण कोरोनामुक्त बुधवारी प्रकृती ठणठणीत झाल्याने १ हजार ६०५ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यात विलासराव देशमुख ...

जिल्ह्यात आणखी १६६८ रुग्णांची भर
बुधवारी १६०५ जण कोरोनामुक्त
बुधवारी प्रकृती ठणठणीत झाल्याने १ हजार ६०५ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील २, सामान्य रुग्णालय २, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल गांधी चौक येथील १६, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील १९५, मुलांची शासकीय निवासी शाळा औसा येथील १३, कोविड केअर सेंटर दापका येथील १२, शासकीय वसतिगृह न्यू बिल्डींग येथील १०, कृषी पीजी कॉलेज चाकूर येथील ५, बावची कोविड केअर सेंटर येथील ९, पूरणमल लाहोटी तंत्रनिकेतन येथील ५६, शासकीय आयटीआय कॉलेज जळकोट येथील ५, समाजकल्याण मुलींचे वसतिगृह जळकोट येथील २, समाजकल्याण हॉस्टेल कव्हा रोड येथील ५३ आणि होम आयसोलेशनमधील ११६७ अशा एकूण १६०५ रुग्णांना बुधवारी सुटी मिळाली.