जिल्ह्यात आणखी १४२१ रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:20 IST2021-04-20T04:20:57+5:302021-04-20T04:20:57+5:30
१३३३ रुग्ण कोरोनामुक्त सोमवारी दिलासादायक बाब म्हणजे तब्बल १३३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यात होम आयसोलेशनमधील ९८३ जणांचा समावेश आहे. ...

जिल्ह्यात आणखी १४२१ रुग्णांची भर
१३३३ रुग्ण कोरोनामुक्त
सोमवारी दिलासादायक बाब म्हणजे तब्बल १३३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यात होम आयसोलेशनमधील ९८३ जणांचा समावेश आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ३, सामान्य रुग्णालय उदगीर येथील ४, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गांधी चौक येथील ६, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील १८५, तोंडार पाटी कोविड केअर सेंटर येथील ४, मरशिवणी कोविड सेंटर येथील ५, मुलींची शासकीय निवासी शाळा औसा येथील १२, उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथील २, शासकीय वसतिगृह न्यू बिल्डिंग देवणी येथील २, बावची कोविड सेंटर येथील ५, पूरणमल लाहोटी तंत्रनिकेतन येथील ५७, शासकीय आयटीआय कॉलेज जळकोट येथील ४, समाजकल्याण वसतिगृह जळकोट येथील ३, समाजकल्याण हॉस्टेल कव्हा रोड येथील ३७ असे एकूण १३३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले.