जिल्ह्यात आणखी १३३९ रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:18 IST2021-04-13T04:18:50+5:302021-04-13T04:18:50+5:30

१४६ रुग्ण आयसीयूमध्ये दवाखान्यात दाखल असलेल्या रुग्णांमध्ये १४६ रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. ३४ रुग्ण गंभीर मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर आहेत. तर ७१ ...

Addition of 1339 more patients in the district | जिल्ह्यात आणखी १३३९ रुग्णांची भर

जिल्ह्यात आणखी १३३९ रुग्णांची भर

१४६ रुग्ण आयसीयूमध्ये

दवाखान्यात दाखल असलेल्या रुग्णांमध्ये १४६ रुग्ण आयसीयूमध्ये आहेत. ३४ रुग्ण गंभीर मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर आहेत. तर ७१ रुग्ण गंभीर बीआयपीएपी व्हेंटिलेटरवर असून, ७९० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तर मध्यम लक्षणाची परंतु विना ऑक्सिजनची ४९८ रुग्ण उपचार घेत असून, सौम्य लक्षणाची ९ हजार ३५५ रुग्ण आहेत.

७४० जणांनी केली कोरोनावर मात

प्रकृती ठणठणीत झाल्याने ७४० जणांना सुटी देण्यात आली. त्यात होम आयसोलेशनमधील ६०७, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील ५३, तोंडार पाटी कोविड केअर सेंटरमधील ६, कृषी पीजी कॉलेज चाकूर येथील २६, शासकीय वसतिगृह न्यू बिल्डींग देवणी येथे ७, समाजकल्याण हॉस्टेल कव्हा रोड येथील ३१ व अन्य खाजगी रुग्णालयातील आहेत. या सर्वांची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली.

Web Title: Addition of 1339 more patients in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.