जिल्ह्यात आणखी १३०३ रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:21 IST2021-04-28T04:21:21+5:302021-04-28T04:21:21+5:30
पाचव्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोनामुक्त जास्त सलग पाचव्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मंगळवारी १ हजार ६४३ रुग्ण ...

जिल्ह्यात आणखी १३०३ रुग्णांची भर
पाचव्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोनामुक्त जास्त
सलग पाचव्या दिवशी बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मंगळवारी १ हजार ६४३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यात होम आयसोलेशनमधील १ हजार २०३, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ३, सामान्य रुग्णालय उदगीर येथील २, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गांधी चौक येथील १९, ग्रामीण रुग्णालय रेणापूर येथील २, जयहिंद सैनिक शाळा कोविड केअर सेंटर उदगीर येथील ४, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील १७९, मरशिवणी कोविड केअर सेंटरमधील ६, मुलांची शासकीय निवासी शाळा औसा येथील १२, दापका कोविड केअर सेंटरमधील १५, बावची कोविड केअर सेंटरमधील ४१, आयटीआय कॉलेज जळकोट येथील २, समाजकल्याण हॉस्टेल येथील ३८ असे एकूण १६४३ रुग्ण कोरोनामुक्त झाले.