जिल्ह्यात आणखीन १२८ रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:36 IST2021-03-13T04:36:13+5:302021-03-13T04:36:13+5:30
रुग्णसंख्येत वाढ... २३ फेब्रुवारीपासून रुग्णसंख्या वाढत गेली आहे. दररोज ५० च्या पुढे रुग्ण आढळत आहेत. महिनाभरात हजार, अकराशे रुग्ण ...

जिल्ह्यात आणखीन १२८ रुग्णांची भर
रुग्णसंख्येत वाढ...
२३ फेब्रुवारीपासून रुग्णसंख्या वाढत गेली आहे. दररोज ५० च्या पुढे रुग्ण आढळत आहेत. महिनाभरात हजार, अकराशे रुग्ण आढळत होते. मात्र, या महिन्यात बारा दिवसांतच ९८२ रुग्ण आढळले आहेत. रॅपिड ॲन्टीजेन टेस्टमध्ये आढळलेल्या रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ६.२ टक्के आहे. तर प्रयोगशाळेतील चाचणीचा पॉझिटिव्हीटी रेट १४.८ टक्क्यांवर गेला आहे. जो की, ५ पेक्षा कमी होता. सदर रुग्णवाढ २० टक्क्यांवर गेली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख यांनी सांगितले.
रुग्ण दुपटीचा कालावधी घसरला...
जिल्ह्यात रुग्ण दुपटीचा कालावधी ७०० दिवसांवर गेला होता. मात्र, गेल्या आठवड्यापासून रुग्ण दुपटीचा कालावधी घसरला आहे. ७०० दिवसांवरुन २५४ दिवसांवर गेला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.७३ टक्के असून, वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे. नियमित मास्कचा वापर करावा, हात वारंवार धुवावेत असे आवाहन जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे.