जिल्ह्यात आणखी ११३४ रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:24 IST2021-04-30T04:24:53+5:302021-04-30T04:24:53+5:30
दरम्यान, रुग्णालयात दाखल असलेल्यांपैकी ८४३ आयसीयूमध्ये आहेत. गंभीर मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर ८८, ३६२ गंभीर बीआयपीएपी व्हेंटिलेटरवर असून, १८४९ मध्यम परंतु ...

जिल्ह्यात आणखी ११३४ रुग्णांची भर
दरम्यान, रुग्णालयात दाखल असलेल्यांपैकी ८४३ आयसीयूमध्ये आहेत. गंभीर मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर ८८, ३६२ गंभीर बीआयपीएपी व्हेंटिलेटरवर असून, १८४९ मध्यम परंतु ऑक्सिजनवर आहेत तर ५८८ मध्यम परंतु विना ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. १० हजार ३९० रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत.
बाधितांपेक्षा कोरोनामुक्त अधिक
गुरुवारी प्रकृती ठणठणीत झाल्याने १४०६ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यात होम आयसोलेशनमधील ९६३, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ३, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गांधी चौक येथील १८, अहमदपूर ग्रामीण रुग्णालय १, जळकोट ग्रामीण रुग्णालय २, ग्रामीण रुग्णालय मुरुड येथील १, जयहिंद सैनिक शाळा कोविड केअर सेंटर, उदगीर येथील ६, तोंडार पाटी कोविड केअर सेंटर येथील ९, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील ६९, मरशिवणी १, दापका १९, कृषी पीजी कॉलेज चाकूर येथे २१, बावची कोविड केअर सेंटरमधील १२, पूरणमल लाहोटी तंत्रनिकेतनमधील ४७, समाजकल्याण मुलींचे शासकीय वसतिगृह जळकोट येथील १५, समाजकल्याण हॉस्पिटल कव्हा रोड येथील ३३ अशा एकूण १४०६ जणांनी कोरोनावर मात केली.