जिल्ह्यात १ हजार ३०६ नव्या रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:21 IST2021-05-06T04:21:05+5:302021-05-06T04:21:05+5:30
७ हजार ७९७ रुग्ण गृहविलगीकरणात सध्या ११ हजार ४७७ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी ४ हजार १८० रुग्ण विविध ...

जिल्ह्यात १ हजार ३०६ नव्या रुग्णांची भर
७ हजार ७९७ रुग्ण गृहविलगीकरणात
सध्या ११ हजार ४७७ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी ४ हजार १८० रुग्ण विविध कोविड केअर सेंटर व दवाखान्यात दाखल असून, ७ हजार २९७ रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.
रुग्णालयातून मिळाली सुटी
रुग्णालयातून सुटी मिळालेल्या रुग्णांमध्ये ८९० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये होेते. तसेच विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील १४, सामान्य रुग्णालय येथील १७, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गांधी चौक येथील ९, ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथील ३, ग्रामीण रुग्णालय चाकूर येथील २, ग्रामीण रुग्णालय किल्लारी येथील १, कासारशिरसी येथील १, जिजामाता जिजाऊ मुलींचे वसतिगृह उदगीर येथील ५, तोंडारपाटी कोविड केअर सेंटर येथील ५, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील १८९, मरशिवणी कोविड केअर सेंटरमीधल १, मुलांची शासकीय निवासी शाळा औसा येथील ८, दापका कोविड केअर सेंटरमधील ११, कृषी पीजी कॉलेज चाकूर येथील १२, पूरणमल लाहोटी तंत्रनिकेतनमधील ७६, समाजकल्याण हॉस्टेल कव्हा रोड येथील ३६ अशा एकूण १३७४ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.