कोरोनाचा संसर्ग वाढल्याने एकुरका सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:18 AM2021-04-12T04:18:18+5:302021-04-12T04:18:18+5:30

तालुक्यात आतापर्यंत ९२४ कोरोनाबाधित होते. त्यापैकी ६०७ जण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या २९६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. शहरात ...

Acurka seal due to increased corona infection | कोरोनाचा संसर्ग वाढल्याने एकुरका सील

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने एकुरका सील

googlenewsNext

तालुक्यात आतापर्यंत ९२४ कोरोनाबाधित होते. त्यापैकी ६०७ जण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या २९६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. शहरात ६८ ॲक्टिव्ह रुग्ण असून, ३० जणांना उदगीर, लातूरला रेफर करण्यात आले आहे. कोविड केअर सेंटरमध्ये ५० जण उपचार घेत आहेत. एकुरका गावात ६० बाधित असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.जगदीश सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय पवार यांनी दिली.

जळकोट शहरासह एकुरका, केकतशिंदगी, वांजरवाडा या परिसरावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. गृहविलगीकरणातील व्यक्तींवर लक्ष देण्यासाठी पथक नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

चाचणी करण्याच्या सूचना...

नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. कोरोना संदर्भातील लक्षणे दिसून येत असल्यास तत्काळ चाचणी करून घ्यावी. प्रत्येक गावात चाचण्या वाढविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. एकुरका, शिंदगी, जळकोट, वांजरवाडा येथे आरोग्यपथक आहे. ४५ वर्षांपुढील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे यांनी केले आहे.

Web Title: Acurka seal due to increased corona infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.