साठे जयंतीनिमित्त लोणी येथे उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:43 IST2021-09-02T04:43:56+5:302021-09-02T04:43:56+5:30

उदगीर : तालुक्यातील लोणी येथील वैष्णवी महिला बचत गटाच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. ...

Activities at Loni on the occasion of Sathe Jayanti | साठे जयंतीनिमित्त लोणी येथे उपक्रम

साठे जयंतीनिमित्त लोणी येथे उपक्रम

उदगीर : तालुक्यातील लोणी येथील वैष्णवी महिला बचत गटाच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी रक्तदान शिबिर घेण्यात आले.

प्रारंभी महिला बचत गटाच्यावतीने विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप करून वृक्षारोपण करण्यात आले. गावातील युवकांच्या पुढाकारातून रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय निटुरे यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजप शहर युवाध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांच्या उपस्थितीत ३२ युवकांनी रक्तदान केले. शिबिर यशस्वीतेसाठी सरपंच यमनाजी भुजबळे, उपसरपंच वैजनाथ बिरादार, कोमल उदासी, सविता गायकवाड, रुक्मीणबाई वाघमारे, कांचन वाघमारे, राधा मुंडे, जनकाबाई सूर्यवंशी, शिवकांत मुळे, अंकुश केंद्रे, पांडुरंग केंद्रे, साधू कांबळे, ज्ञानेश्वर गायकवाड, हरिभाऊ गुलफुले, माधव सूर्यवंशी, इंद्रजित सूर्यवंशी, राजकुमार सताळे, सुभाष गायकवाड, रामकिशन गायकवाड आदींनी पुढाकार घेतला.

Web Title: Activities at Loni on the occasion of Sathe Jayanti