विलासराव देेशमुख फाउंडेशनच्या वतीने उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:18 IST2021-03-28T04:18:22+5:302021-03-28T04:18:22+5:30
एसआयओ लातूरतर्फे बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन लातूर : स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेच्या लातूर शाखेतर्फे १० वी ...

विलासराव देेशमुख फाउंडेशनच्या वतीने उपक्रम
एसआयओ लातूरतर्फे बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
लातूर : स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेच्या लातूर शाखेतर्फे १० वी आणि १२ वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेची तयारी कशी करावी या विषयावर व्याख्यान मालिका घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. एसआयओच्या वतीने ९ ते १७ मार्च दरम्यान शहरातील हजरत सुरतशाह शाळा, अल फलाह शाळा, एच. पी. शाळा, रुकय्या बेगम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच निलंगा शहरातील रहमानीया शाळेत व्याख्यान घेण्यात आले. याशिवाय याच विषयावर संघटनेतर्फे एक ऑनलाइन वेबिनारसुद्धा घेण्यात आले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. साजिद पठाण, एसआयओचे शहराध्यक्ष जुनेद अकबर यांनी परिश्रम घेतले.
नजीऊल्ला शेख यांना शाळास्नेही बालरक्षक पुरस्कार
लातूर : मुंबई येथील बालरक्षक प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय शाळास्नेही बालरक्षक सन्मान पुरस्कार जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, नांदगाव येथील शिक्षक तथा बालरक्षक नजीऊल्ला शेख यांना जाहीर झाला आहे. ३ एप्रिल रोजी मुंबई येथे पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे. या यशाबद्दल शिक्षणाधिकारी विशाल दशवंत, डायटचे प्राचार्य अनिल मुरकुटे,
गटशिक्षणाधिकारी धनराज गिते, जिल्हा समन्वयक चंद्रकांत ठाकरे, केंद्रप्रमुख बालाजी कोळी, मुख्याध्यापक सोनाजी भंडारे आदींसह शिक्षक, कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.
जिल्हा अध्यक्षपदी योगेश शिंदे यांची निवड
लातूर : मातंग एकता आंदोलन लातूर जिल्हा अध्यक्षपदी योगेश शिंदे यांची निवड करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश बागवे यांनी ही निवड केली. या निवडीबद्दल दीपक शिंदे, उमाकांत कांबळे, अभिजित आवळे, बालाजी अंधारे, वरुण गायकवाड, आकाश वाघमारे, विशाल आवळे, शिवदास गायकवाड आदींसह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.