कुमठा येथे रोटरी क्लबच्या वतीने उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:24 IST2021-02-05T06:24:27+5:302021-02-05T06:24:27+5:30
... वडवळ नागनाथ येथे ध्वजारोहण कार्यक्रम वडवळ (ना.) : प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील बापुसाहेब पाटील विद्यालयात अध्यक्ष अण्णासाहेब पाटील ...

कुमठा येथे रोटरी क्लबच्या वतीने उपक्रम
...
वडवळ नागनाथ येथे ध्वजारोहण कार्यक्रम
वडवळ (ना.) : प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील बापुसाहेब पाटील विद्यालयात अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण झाले. विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीत चेअरमन सागर नवने, ग्राम पंचायतीत प्रशासकीय अधिकारी अभियंता भोंडवे, जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक रामकिशन खडके, पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉ. घारे, अमरज्योती ग्रंथालयात अध्यक्ष वैजनाथअप्पा नंदागवळे, आयुवैदिक दवाखान्यात डॉ. वामन राठोड, विद्यानिकेतन विद्यालयात अध्यक्ष सिद्रामप्पा आचवले, जिल्हा बँकेत शाखा व्यवस्थापक चौधरी, महावितरण कार्यालयात अभियंता शिंदे, वटसिध्द नागनाथ आश्रमशाळेत संस्था सचिव सुरेश हाके पाटील, उर्दू शाळेत नूर पटेल, जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
...
किशोरवयीन मुला- मुलींना वैद्यकीय मार्गदर्शन
पानगाव : येथील सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठाणच्या वतीने येथील सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणात किशोरवयीन मुला- मुलींना वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मानव विकास संस्थेचे अध्यक्ष तथा पन्नगेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष किशनराव भंडारे होते. यावेळी डॉ. अमृता पाटील, डॉ. मिलींद पोतदार यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना मास्कचे मोफत वाटप करण्यात आले. राहुल लोंढे व ज्ञानेश्वर तुगावे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी प्रतिष्ठानचे सहसचिव पुरुषोत्तम भांगे, मुरलीधर डोणे, व्यंकटराव अनामे, ग्रामपंचायत सदस्या प्रणिता भंडारे, मुख्याध्यापक धर्मराज चेगे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी बालासाहेब यादव, प्रा. मनोहर कबाडे, डॉ. अशोक आरदवाड, डॉ. अनुजा कुलकर्णी, डॉ. अनघा राजपूत, अनिल फुलारी, संभाजी कुरे, शरद ठाकूर यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्रतिष्ठानचे सचिव प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, कोषाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रल्हाद डोंगरे, शशिकांत नाब्दे यांनी केले. आभार वैजनाथ चामले, सुलेचना माले यांनी मानले.