मुख्यालयी न राहणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:25 IST2021-06-09T04:25:02+5:302021-06-09T04:25:02+5:30
राज्यात शासकीय कार्यालयात पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी २९ फेब्रुवारी २०२० पासून लागू झाली आहे. ...

मुख्यालयी न राहणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा
राज्यात शासकीय कार्यालयात पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी २९ फेब्रुवारी २०२० पासून लागू झाली आहे. सर्व शासकीय कार्यालयांच्या कामकाजाची वेळ ४५ मिनिटांनी वाढविण्यात आली. त्यामुळे सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी वेळ ठेवण्यात आली आहे. चाकूर तालुक्यात शासकीय अधिकारी, कर्मचारी घरभाडे उचलून मुख्यालयी राहत नाहीत. तालुक्यातील एका ही शासकीय कार्यालयात सर्व अधिकारी, कर्मचारी सकाळी ९.४५ वाजता वेळेवर हजर राहत नाहीत. सायंकाळी ६.१५ पर्यंत कार्यालयात उपस्थिती राहत नाही. ज्यांनी मुख्यालयी न राहता घरभाडे उचलून शासनाची फसवणूक केली आहे. जे घरभाडे उचलतात आणि मुख्यालयी राहत नाहीत. अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर सुधाकरराव लोहारे, नारायण बेजगमवार, अजित घंटेवाड, अजय धनेश्वर, गोकूळ जाधव, अजिंक्य पाटील,राम कंठे आदींची नावे आहेत.
मुख्यालयी राहणे बंधनकारक...
शासकीय, निमशासकीय, अधिकारी, कर्मचारी यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. याप्रकरणी तालुक्यातील सर्व कार्यालयीन प्रमुख यांना यापूर्वी दोन वेळा लेखी कळविले आहे. परंतु पुन्हा आदेश देऊन कळवत आहे. त्यावर कोणी मुख्यालयी राहत नसेल तर अशा विरुध्द निश्चितपणे कारवाई करण्यात येईल.
- डॉ. शिवानंद बिडवे, तहसीलदार चाकूर