शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

लातुरातील गुन्हेगारावर ‘एमपीडीए’नुसार कारवाई; नाशिक कारागृहात रवानगी

By राजकुमार जोंधळे | Updated: May 3, 2024 23:58 IST

लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पाेलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा (एमपीडीए) कायद्यानुसार लातुरातील सुभेदार रामजीनगर परिसरात राहणारा स्वप्निल उर्फ पन्या गौतम कांबळे (२४) याच्याविरुद्ध कारवाई केली आहे.

लातूर : सार्वजनिक शांततेला बाधा आणणाऱ्या एका सराईत गुन्हेगारावर पाेलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा कायद्यानुसार (एमपीडीए अॅक्ट) कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याची नाशिकच्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी शुक्रवारी दिली.

लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पाेलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा (एमपीडीए) कायद्यानुसार लातुरातील सुभेदार रामजीनगर परिसरात राहणारा स्वप्निल उर्फ पन्या गौतम कांबळे (२४) याच्याविरुद्ध कारवाई केली आहे. एमपीडीए कायद्यानुसार कारवाईचा लातुरातील कायदा व सुव्यवस्था अडचणीत आणणाऱ्या गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी, गुन्हेगारी रोखण्यासाठी लातूर पोलिसांकडून कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. स्वप्निल उर्फ पन्या गौतम कांबळे याला 'एमपीडीए' कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्याची नाशिक येथील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. जिल्हा पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या कार्यकाळातील एमपीडीए कायद्यानुसार करण्यात आलेली ही नववी कारवाई आहे.

स्थानबद्धतेच्या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी... -ही कारवाई जिल्हा पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशानुसार अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, डीवायएसनी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, एमआयडीसी ठाण्याचे पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे, पाेउपनि. संदीप कराड, विष्णू वायगावकर, गणेश मालवदे, भीमराव बिल्लाळे, अर्जुन राजपूत, युवराज गिरी, सिद्धेश्वर मदने, संतोष खांडेकर यांच्या पथकाने केली. त्यांनी स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे याच्याकडे मंजुरीसाठी पाठविला होता. दरम्यान, या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे.

गाैतम कांबळेविराेधात १३ गंभीर गुन्ह्यांची नाेंद... -लातुरातील गुन्हेगार स्वप्निल उर्फ पन्या गौतम कांबळे याच्याविराेधात लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात एकूण १३ गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नाेंद आहे. यामध्ये शस्त्रासह शरीराविरुद्ध, जबरीने मालमत्ता चोरी करणे, मालमत्ता चोरी, भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्ह्यांचा समावेश आहे. - साेमय मुंडे, पाेलिस अधीक्षक 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस