जादा दराने खत विक्री केल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:20 IST2021-05-21T04:20:37+5:302021-05-21T04:20:37+5:30
माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा वापर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर माती परीक्षणानुसार करावा, रासायनिक खताचा कमीतकमी व संतुलित वापर ...

जादा दराने खत विक्री केल्यास कारवाई
माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा वापर
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर माती परीक्षणानुसार करावा, रासायनिक खताचा कमीतकमी व संतुलित वापर होण्याच्या उद्देशाने खत बचतीची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये किमान १० टक्के रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी मे महिन्याच्या चालू सप्ताहात या मोहिमेचा प्रचार क्षेत्रीयस्तरावर करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी तूर, सोयाबीन, कापूस, ऊस इत्यादी पिकांकरिता खत वापराचे विविध फायदेशीर पर्याय उपलब्ध करून देणे, ग्रामपंचायतस्तरावर जमीन सुपीकता निर्देशांक दर्शविणारा फलक प्रदर्शित करणे, त्याचे सामूहिक वाचन करणे, आरोग्य पत्रिकेनुसार खताचा वापर करणे, जैविक खतांची बीज प्रक्रिया करणे, युरिया खताचा जास्त वापर असलेल्या तालुक्यातील सर्व कृषी केंद्र चालकांना प्रशिक्षण देणे, जमिनीत सेंद्रिय कर्बाची वाढ करणे, उसाची पाचड जागेवर कुजविणे, गांडूळ खत, कंपोस्ट खत यांचा वापर वाढवून रासायनिक खतांची मागणी कमी करणे याबाबतही प्रशिक्षण दिले जात आहे. या मोहिमेत शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.