शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाळू विक्रीप्रकरणी वाहनावर धडक कारवाई

By राजकुमार जोंधळे | Updated: June 8, 2023 05:39 IST

कोकळगाव, औरादच्या तीन ट्रॅक्टरमालकांवर गुन्हा

राजकुमार जाेंधळे, निलंगा / औराद शहाजानी (जि. लातूर) : कोकळगाव आणि औराद शाहजानी परिसरात अवैध वाळू विक्री करणाऱ्या तीन ट्रॅक्टरमालकांवर उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यानी दंडात्मक कारवाई केली असून, त्यांच्याविराेधात निलंगा पोलिस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.

निलंगा तालुक्यातील तेरणा नदी पात्रातील विनापरवाना अवैध वाळू उपसा करणाऱ्या औराद येथील जावेद सरफोद्दिन मुल्ला (रा. वांजरखेडा), भागवत लक्ष्मण जाधव ( रा. मानेजवळगा) यांचे ट्रॅक्टरमधून (एमएच २० सीआर २९३५) शासन मालकीच्या वाळूचा उपसा करून अवैधरीत्या वाहतूक करत हाेते. या वाळूची विक्री करत असल्याचे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना आढळून आले. दरम्यान, ६ जून रोजी औराद शाहजानी येथील कर्नाटक सीमाभागातील टोल नाक्याजवळ ते ट्रॅक्टर पकडून त्यातील तीन लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याचबराेबर वाळू विक्रीप्रकरणी औराद शाहजानी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर शासकीय नियमानुसार १ लाख २० हजार रुपयांचा दंड केला आहे.

काेकळगावात दहा लाखांचा मुद्देमाल जप्त..

कोकळगाव येथील दोन ट्रॅक्टरमालक, चालकांनी तेरणा नदीपात्रातील अवैध वाळूचा उपसा करून ट्रॅक्टरमधून वाळूची विक्री करण्यासाठी घेऊन जात हाेते. कोकळगाव शाळेच्या पाठीमागील शेतात रात्री १ वाजता उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्या पथकाने छापा मारला. घटनास्थळावरून ट्रॅक्टरमालक, चालक वाहन सोडून पळून गेले. याबाबत कासार शिरसी ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळावरून ७ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिवाय, विनानंबर दोन्ही ट्रॅक्टरच्या मालक, चालकावर २ लाख ४० हजारांचा दंड ठोठावला आहे. ही कारवाई तलाठी मुकेश सागावे, मधुकर सूर्यवंशी, गंगाराम सूर्यवंशी, पोलिस कर्मचारी भोसले यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूरnilanga-acनिलंगा