विनामास्क फिरणाऱ्या १५० नागरिकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:20 IST2021-04-04T04:20:00+5:302021-04-04T04:20:00+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शासनाने कडक निर्बंध घातले असून, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाचा ...

विनामास्क फिरणाऱ्या १५० नागरिकांवर कारवाई
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शासनाने कडक निर्बंध घातले असून, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाचा नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी नगरपंचायत आणि पोलीस ठाण्याच्या वतीने संयुक्त पथक सक्रिय झाले आहे. या पथकाकडून रस्त्याने विनाकारण फिरणे, माॅस्क न घालणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे आदी प्रकारच्या कोरोना नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकावर दंडात्मक कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला आहे. मागील पंधरा दिवसांपासून कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. परिणामी आतापर्यंत दीडशे नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्याने विनाकारण फिरणाऱ्या नागरीकाना चांगलाच जरब बसला आहे. आवश्यक कामासाठी घराबाहेर पडणारे. बहुतांश नागरिक माॅस्क घालून फिरताना दिसत आहेत, परंतु अद्याप काही जणांना माॅस्क वापरण्याचे भान राहिल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे सकाळ-सायंकाळ संयुक्त पथक सक्रिय करण्यात आले आहे.
प्रत्येकी शंभर रुपयांचा दंड वसूल...
कोरोनाच्या नियमावलीचे उल्लंघन करून विनाकारण रस्त्याने फिरणे, माॅस्क न घालणे, अनावश्यक गर्दी करणे आदी प्रकारच्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून प्रत्येकी शंभर रुपयांचा दंड वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे दीडशे नागरिकांकडून पंधरा हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
दंडात्मक कारवाई सुरूच राहणार...
नगरपंचायत आणि पोलीस ठाण्याच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या संयुक्त पथकाची दंडात्मक कारवाई सुरूच राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमावलीचे उल्लंघन करू नये, असे आवाहन पथकाचे जिलानी शेख, पोहेकॉ हरिदास पाटील, करीमपाशा शेख यानी केले आहे.