रेकाॅर्डवरील १४४८ गुन्हेगारांवर कारवाई; १८ तडीपारीचे प्रस्ताव सुणावणीच्या फेऱ्यात।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:21 IST2021-09-11T04:21:43+5:302021-09-11T04:21:43+5:30

कारवाईनंतर जिल्ह्यात फिरणाऱ्या १४ जणांना बेड्या... पाेलीस ठाण्यांच्या रेकाॅर्डवर आणि पाेलिसांना सतत गुंगारा देत फरार असलेल्या १४ गुन्हेगारांच्या मुसक्या ...

Action against 1448 criminals on record; 18 Tadipari's proposal in the hearing round. | रेकाॅर्डवरील १४४८ गुन्हेगारांवर कारवाई; १८ तडीपारीचे प्रस्ताव सुणावणीच्या फेऱ्यात।

रेकाॅर्डवरील १४४८ गुन्हेगारांवर कारवाई; १८ तडीपारीचे प्रस्ताव सुणावणीच्या फेऱ्यात।

कारवाईनंतर जिल्ह्यात फिरणाऱ्या १४ जणांना बेड्या...

पाेलीस ठाण्यांच्या रेकाॅर्डवर आणि पाेलिसांना सतत गुंगारा देत फरार असलेल्या १४ गुन्हेगारांच्या मुसक्या पाेलीस पथकांनी आवळल्या आहेत. हे गुन्हेगार गुन्हे दाखल झाल्यापासून जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात फिरत हाेते. या आराेपींचा पाेलिसांनी शाेध घेत त्यांना अटक केली आहे. पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे.

१८ जणांचे तडीपारीसाठी प्रस्ताव दाखल...

लातूर जिल्ह्यातील २३ पाेलीस ठाण्यांच्या हद्दितील १८ आराेपींवर तडीपारीची कारवाई करण्यात यावी, यासाठी त्या-त्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तडीपारीचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. अद्यापही या प्रस्तावावर सुनावणी सुरू आहे. शिवाय, दाखल असलेल्या एकूण दोन हजार ६११ गुन्हेगारांपैकी तब्ब्ल १ हजार ४४८ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. - निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक, लातूर

Web Title: Action against 1448 criminals on record; 18 Tadipari's proposal in the hearing round.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.