लातुरात ८२ दुचाकींवर कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:25 IST2021-02-17T04:25:22+5:302021-02-17T04:25:22+5:30
रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने गांधीचौकासह शहराच्या विविध भागात कारवाई करण्यात आली.वाहनांचे मूळ कागदपत्र नसणे, इन्शुरन्स, ...

लातुरात ८२ दुचाकींवर कारवाईचा बडगा
रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने गांधीचौकासह शहराच्या विविध भागात कारवाई करण्यात आली.वाहनांचे मूळ कागदपत्र नसणे, इन्शुरन्स, वाहन चालविण्याचा परवाना, हेल्मेट, ट्रिपल सीट प्रवास, गाडी चालवित असताना मोबाईलवर बोलणे, नियमबाह्य नंबरप्लेट लावणार्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय, १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या दुचाकी चालकांना दंड आकारण्यात आला आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांच्या मार्गदर्शनात सदरील कारवाई मोहिम राबविण्यात येत आहे.हेल्मेटवाल्यांचा केला सत्कार...
दुचाकी चालवित असताना हेल्मेटचा वापर करणार्या चालकांचा प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने पुष्प देऊन सत्कार केला. याप्रसंगी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशितोष बारकुल, प्रसाद नलवडे, मोटार वाहन निरीक्षक संजय अडे, अशोक जाधव, श्यातांराम साठे, बजरंग कोरावले, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विजय कांबळे, नितेश उमाळे, रोहित कारवार, मेलगिरी यांनी कारवाई मोहिमेत सहभाग नोंदविला.