अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस दोन दिवसाची कोठडी
By आशपाक पठाण | Updated: August 21, 2023 23:46 IST2023-08-21T23:46:43+5:302023-08-21T23:46:47+5:30
आई -वडिलास सांगितली तर तुला व तुझ्या आई वडिलास जिवे मारून टाकतो अशी धमकी देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस दोन दिवसाची कोठडी
उदगीर (जि. लातूर) : तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील २२ वर्षीय आरोपीस न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपी धनराज शेल्हाळे याने रविवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या घरात घुसून फिर्यादीच्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार करताना मिळून आला. त्यावेळी फिर्यादीने पीडित मुलीस हा कसा काय घरात आला असे विचारले असता तिने सांगीतले की , गेले सहा महिन्यांपासून नमूद आरोपी हा पीडित मुलगी जिथे जाईल तिथे पाठलाग करुन मी तुझ्यावर खुप प्रेम करतो. मला तुझ्या सोबत लग्न करायचे आहे असे म्हणून वारंवार पाठलाग करून वाईट उद्देशाने हात धरून ओढला होता. सदरची घटना तुझ्या आई -वडिलास सांगितली तर तुला व तुझ्या आई वडिलास जिवे मारून टाकतो अशी धमकी देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात सोमवारी पहाटे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीमंगल हे करीत आहेत.