वडिलांचा हत्या करणा-या फरार आरोपीची आत्महत्या
By Admin | Updated: March 3, 2017 13:29 IST2017-03-03T13:29:08+5:302017-03-03T13:29:08+5:30
कौटुंबिक वादातून आपल्याच वडिलांना जीवे मारणा-या आरोपी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धोंडवाडी येथे शुक्रवारी दुपारी उघडकीस आली आहे.

वडिलांचा हत्या करणा-या फरार आरोपीची आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 3 - कौटुंबिक वादातून आपल्याच वडिलांना जीवे मारणा-या आरोपी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धोंडवाडी येथे शुक्रवारी दुपारी उघडकीस आली आहे. जळकोट तालुक्यातील धोंडवाडी येथील लक्ष्मण घुले (वय ४५) यांची बुधवारी दुपारी राहत्या घरी हत्या करण्यात आली. कौटुंबिक वादातून त्यांची पत्नी आणि मुलाने त्यांना ठार केले, अशी फिर्याद बाबु घुले यांनी जळकोट पोलिसांकडे दिली.
त्यानुसार मृताची पत्नी व मुलाविरुद्ध जळकोट पोलिसांत कलम ३०२ अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी पत्नी गवळण घुलेला पोलिसांनी गुरुवारी अटक केली. मात्र आरोपी मुलगा बालाजी (वय २८) हा घटनेच्या दिवसापासून फरार होता. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असतानाच शुक्रवारी दुपारी त्याने आपल्या शेतातील विहिरीशेजारच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. याची माहिती तातडीने जळकोट पोलिसांना देण्यात आली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.