माती परीक्षण अहवालानुसार शेतकऱ्यांनी खत वापरावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:20 IST2020-12-06T04:20:38+5:302020-12-06T04:20:38+5:30
हरंगुळ बु. : शेतकऱ्यांनी माती परीक्षण करुन घेऊन त्याच्या अहवालानुसार खतांचा वापर करावा. त्यामुळे जमिनीचा पोत चांगला राहण्यास मदत ...

माती परीक्षण अहवालानुसार शेतकऱ्यांनी खत वापरावे
हरंगुळ बु. : शेतकऱ्यांनी माती परीक्षण करुन घेऊन त्याच्या अहवालानुसार खतांचा वापर करावा. त्यामुळे जमिनीचा पोत चांगला राहण्यास मदत होते, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले.
जागतिक मृदा दिनानिमित्त कृषी विभागाच्या वतीने हरंगुळ खु. येथे शेतकरी मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक गुरुनाथ झुंजे पाटील हे होते. यावेळी सरपंच दादाराव पवार, सिद्धांत गायकवाड, कृषी सहाय्यक सूर्यकांत लोखंडे, प्रशांत पवार आदी उपस्थित होते. यावेळी गायकवाड म्हणाले, माती नमुना काढताना पाणथळ जमीन, जनावरे बांधली जातात त्या ठिकाणची अथवा रासायनिक खते वापरली असल्यास त्या ठिकाणची माती घेऊ नये, असे सांगितले. यावेळी शिवहार गावकरे यांच्या शेतात प्रात्यक्षिक करुन दाखविले.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य मनोहर झुंजे, तंटामुक्तीचे अध्यक्ष अरुण झुंजे पाटील, प्रगतिशील शेतकरी मनोहर भुजबळ, गणपती होळकर, महादेव मसलकर, सिद्धेश्वर झुंजे, पंडित पाटील, ग्यानदेव होळकर, रमाकांत झुंजे, शिवहार गावकरे, बसवेश्वर पाटील, कपिल झुंजे, रमाकांत गावकरे, शेखर पाटील, सुभाष कुंभार, श्रीमंत गावकरे, विश्वनाथ गावकरे, एकनाथ होळकर, बब्रु पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.
***