कोरोणाच्या संचारबंदीत शेती मशागतीच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:19 IST2021-05-08T04:19:58+5:302021-05-08T04:19:58+5:30

नागरसोगा परिसरात खरीप हंगामाची पेरणी जवळपास १ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर होत असते.त्यात सर्वाधिक सोयाबीन पेरा होत असून ...

Acceleration of agricultural cultivation in Korona | कोरोणाच्या संचारबंदीत शेती मशागतीच्या कामाला वेग

कोरोणाच्या संचारबंदीत शेती मशागतीच्या कामाला वेग

नागरसोगा परिसरात खरीप हंगामाची पेरणी जवळपास १ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर होत असते.त्यात सर्वाधिक सोयाबीन पेरा होत असून

त्यानंतर मुग , उदिड,तुर, सकरीत ज्वारी. तीळ.मक्का या पिकांचा पेरा केला जातो. यंदा पावसाळा चांगला झाल्यामुळे उसाच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे सध्या कोरोनाची भीतीमुळे शेतमजूर शेतात कामाला येत नसल्यामुळे शेतकऱ्याला त्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. खुरपणे,कडबा

गोळा करणे, ऊसातील अंतर मशागत मजूराअभावी स्वताला करावी लागत आहे. मार्च महिन्यात पुन्हा दुप्पट वेगाने संसर्गागाचे प्रणात वाढ होऊन मृत्यू होत आहेत. तरीही शेतकरी आगामी काळातील खरीप हगाम शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. शेतकरी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बी-बियाणे खरेदी करत असतात. त्यावेळेस कृषी केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यानच्या काळात कोरोना आटोक्यात आला नाही तरच शेती व्यवसाय पुढे मोठे समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Acceleration of agricultural cultivation in Korona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.