ग्रामपंचायत निवडणुकीच्या हालचालींना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:26 IST2020-12-30T04:26:13+5:302020-12-30T04:26:13+5:30
निलंगा तालुक्यातील उस्तुरी येथे ग्राम पंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, गावातील कट्यावर, चौका-चाैकात हाॅटेलमध्ये निवडणूक रिंगणात काेण-काेण उडी ...

ग्रामपंचायत निवडणुकीच्या हालचालींना वेग
निलंगा तालुक्यातील उस्तुरी येथे ग्राम पंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, गावातील कट्यावर, चौका-चाैकात हाॅटेलमध्ये निवडणूक रिंगणात काेण-काेण उडी मारणार, काेणता प्रभाग काेणासाठी सरस ठरणार, यांची चर्चा आता रंगली आहे. परिणामी, दिवसेंदिवस निवडणुकीतील राजकीय रंगत वाढत असल्याचे दिसून येत आहे. गावपातळीवरील राजकीय आखाडा आता तापू लागला आहे. उस्तुरी येथे ११ ग्रामपंचायत सदस्य संख्या आहे. एकूण चार प्रभाग असून, त्यासाठी १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया हाेत आहे. यासाठी उस्तुरी येथील १ हजार २७८ पुरुष तर १ हजार ७२ महिला मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सन २०१५ मध्ये अटीतटीची लढत झाली होती. सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. २०१५ मध्ये येथे दुरंगी लढत झाली हाेती. यामध्ये भाजपचे ६ सदस्य विजयी झाले होते. तर काँग्रेसचे ६ सदस्य विजयी झाले होते. यावेळीही येथे दुरंगी लढत हाेणार असल्याचे दिसून येत आहे. काही प्रभागात दोन्ही पॅनलकडून तरुणांना संधी देण्यात आली आहे. परिणामी, या निवडणुकीत चुरच असल्याचे दिसून येणार आहे. निवडणुकीसाठी गावात गावपुढाऱ्यांकडून राजकीय मोर्चेबांधणीला प्रारंभ झाला आहे.