जिल्हा बँक निवडणुकीच्या हालचालींना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:42 IST2021-09-02T04:42:36+5:302021-09-02T04:42:36+5:30
जळकोटात जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक धर्मपाल देवशेट्टे आहेत. तालुक्यात एकूण ३६ चेअरमन आहेत. त्यापैकी ३३ चेअरमन यांनी माजी मंत्री ...

जिल्हा बँक निवडणुकीच्या हालचालींना वेग
जळकोटात जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक धर्मपाल देवशेट्टे आहेत. तालुक्यात एकूण ३६ चेअरमन आहेत. त्यापैकी ३३ चेअरमन यांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची भेट घेऊन आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे असलो तरी आपल्या कार्यपद्धतीवर आमचा विश्वास आहे. सहकारात पक्ष बाजूला ठेवून धर्मपाल देवशेट्टी यांना आपल्या पॅनलमध्ये घेण्यात यावे, अशी मागणी केली.
या शिष्टमंडळात शिवसेनेचे तालुकाप्रमुख तथा चेअरमन संगमेश्वर टाले, गणपतराव धुळशेटे, हनुमंत नागलगाव, माधव बोरकर, बालाजी पवार, बालाजी गुट्टे, सुधीर गव्हाणे, बापूराव पाटील, धोंडिराम बडे, गंगाधर मुसळे, अमित केंद्रे, शेषराव गव्हाणे, सूर्यकांत पाटील, मारुती आगलावे, विनायक पाटील, दिगंबर सोनटक्के आदी होते.
एकंदरित जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी तालुक्यात रंग भरू लागला असून बैठकांना वेग आला आहे. तसेच तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मारुती पांडे यांचेही नाव आघाडीवर आहे. यापूर्वी देवशेट्टे हे अपक्ष म्हणून निवडून आले होते.