महाविद्यालय सुरू करण्यासाठी अभाविपचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:25 IST2021-02-05T06:25:32+5:302021-02-05T06:25:32+5:30
कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर शाळा, मंदिर, रेल्वे व कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. पण अजून वरिष्ठ महाविद्यालये बंदच आहेत. ...

महाविद्यालय सुरू करण्यासाठी अभाविपचे आंदोलन
कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर शाळा, मंदिर, रेल्वे व कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. पण अजून वरिष्ठ महाविद्यालये बंदच आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. येत्या मार्च महिन्यासून अनेक विद्याशाखांच्या परीक्षा सुरू होणार आहेत. तरीही राज्य शासन अजून महाविद्यालय सुरू करण्याचा विचार करीत नाही. सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीत महाविद्यालय सुरू करण्याची मागणी केली होती. महाविद्यालय सुरू करण्यासाठी विद्यापीठांनी प्रस्तावही दिले आहेत. मात्र अद्याप सरकारने निर्णय घेतला नाही. त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने मंगळवारी दयानंद महाविद्यालयाच्या गेटसमोर तसेच स्वारातीम विद्यापीठाच्या लातूर उपकेंद्रासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात जिल्हा संयोजक पवन बेळकोणे, महानगर मंत्री प्राजक्ता भोसले, प्रसाद मुदगले, प्रणव नागराळे, विश्वजीत पाटील, वैष्णवी कुलकर्णी, कृष्णा बिराजदार आदींनी मार्गदर्शन केले. आंदोलनात अभाविपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.