शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
7
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
8
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
11
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
12
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
13
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
14
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
15
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
16
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
17
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
19
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
20
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी

लातुरात दिवसाढवळ्या तरुणीचे सिनेस्टाईल अपहरण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2017 21:18 IST

येथील एमआयडीसी परिसरातील वसतीगृहातील एका तरुणीचा चार अज्ञात आरोपींनी पाठलाग करत सिनेस्टाईल अपहरण केल्याच्या घटनेने लातुरात खळबळ उडाली आहे.

ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 20 : येथील  एमआयडीसी परिसरातील वसतीगृहातील एका तरुणीचा चार अज्ञात आरोपींनी पाठलाग करत सिनेस्टाईल अपहरण केल्याच्या घटनेने लातुरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली. 
एमआयडीसी परिसरातील असलेल्या एका वसतीगृहावर अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या तीस वर्षीय तरुणीचा चार जणांनी पांढ-या कारमधून पाठलाग करुन चक्क सिनेस्टाईल अपहरण केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. ती मुलगी दुचाकीवरुन वसतीगृहाबाहेर पडल्यानंतर या चौघांनी तिचा पाठठलाग केला. आपला कारमधील काही तरुण पाठलाग करत असल्याचा संशय आल्यामुळे तिने स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पांढºया कारमधून पाठलाग करणा-यांनी तिला अभिनव महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळून उचलून आपल्या कारमध्ये कोंबले आणि कार कळंब रोडच्या दिशेने सुसाट गेली. पुढे ही कार कुठे गेली याचा ठावठिकाणा मात्र, पोलिसांना लागला नाही. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. 
 
लोक धावेपर्यंत अपहरणकर्ते पळाले ! 
सायंकाळच्या दरम्यान, या परिसरात कोणीच नसल्याने या अपहरणकर्त्यांना कोणीच रोखू शकले नाही. काही लोक तिथे येईपर्यंत ही कार सुसाट निघून गेली होती. या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरुन एक दुचाकी (एम. एस. २८ ए. पी. ३१९१) ताब्यात घेतली आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे  पोलिस निरीक्षक बावकर यांनी तातडीने दोन पोलिस गाड्या ज्या दिशेने अपहरणकर्त्यांची कार गेली त्या मार्गावर पाठविल्या. याशिवाय तातडीने शहराबाहेर नाकाबंदी केली आहे.
 
अपहृत मुलगी पोलिस कर्मचा-याची ? 
पोलिसांनी घटनास्थळावरुन ताब्यात घेतलेल्या स्कुटीवर समोरील भागावर पोलिस खात्याच्या बोधचिन्हाचे स्टिकर चिकटवलेले आहे. त्यामुळे ही मुलगी पोलिस कर्मचा-याची असवी असा प्राथमिक अंदाज एमआयडीसी पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेनंतर पोलिसांनी या कारचा माग काढला, मात्र, त्यांच्या हाती ही कार आणि चार अपहरणकर्ते लागले नाहीत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.