शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह; लातूरच्या खोपेगाव शिवारातील घटना

By राजकुमार जोंधळे | Updated: April 5, 2024 18:58 IST

ओळख पटविण्याचा प्रयत्न; आराेपींच्या शाेधात पाेलिस पथक रवाना

लातूर : अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आज सकाळी खाेपेगाव शिवारातील छत्रपती चाैक ते कव्हा तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आढळून आल्याने लातुरात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न पाेलिस करीत आहेत. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरानजीक असलेल्या खाेपेगाव शिवारात छत्रपती चाैक ते कव्हा तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर २८ वर्षीय तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आल्याची माहिती विवेकानंद चाैक ठाण्याच्या पाेलिसांना मिळाली. या माहितीनंतर पाेलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पाेलिसांनी पंचनामा केल्यानंतर याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात श्रीधर वसंतराव वाघमारे (वय २६, रा. एलआयसी काॅलनी, लातूर) यांनी दिलेल्या माहितीवरून प्रारंभी आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात केली. दरम्यान, उत्तरीय तपासणी केल्यानंतर डाॅक्टरांच्या माहितीवरून हा खून अल्याचा प्रकार समाेर आला आहे. याबाबत शुक्रवारी विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पाेलिस निरीक्षक शिनगारे करीत आहेत.

ओळख पटविण्याचा प्रयत्न;आराेपींच्या शाेधात पाेलिस...खाेपेगाव शिवारातील कव्हा राेडवर एका तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला असून, त्याची अद्यापही ओळख पटलेली नाही. मृतदेहाची ओळख पटली, तर या गुन्ह्याचा उलगडा हाेण्याला वेळ लागणार नाही. याबाबत पाेलिस अधिक चाैकशी, अज्ञात मारेकऱ्यांचा शाेध घेत आहेत. खून करून, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हा गुन्हा केल्याचे समाेर आले आहे. लवकरच या गुन्ह्यातील आराेपींना अटक करण्यात येईल. - वैजनाथ मुंडे, पाेलिस निरीक्षक, लातूर.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी