ऑटोरिक्षा क्रेनला लटकवून लातुरात अनोखे आंदोलन
By हणमंत गायकवाड | Updated: October 12, 2023 18:58 IST2023-10-12T18:57:48+5:302023-10-12T18:58:03+5:30
ऑटोचे मुक्त परवाना धोरण रद्द करण्याची मागणी

ऑटोरिक्षा क्रेनला लटकवून लातुरात अनोखे आंदोलन
लातूर : शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने गुरुवारी ‘होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ऑटोरिक्षा क्रेनला लटकवून रॅली काढून अनोखे अंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक सेना जिल्हाध्यक्ष त्र्यंबक स्वामी व शिवसेना सहसंपर्कप्रमुख संतोष सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. रिक्षामध्ये पुढील सीटवर प्रतीकात्मक मुख्यमंत्री व मागील सेटवर दोन उपमुख्यमंत्री बसवून सरकारचे लक्ष वेधून रिक्षाचालक कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी करावी, ऑटो रिक्षाचे परमिट बंद झाले पाहिजे, राज्यातील कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या, तसेच रिक्षावर झाड कोसळून अपघातामुळे मयत झालेल्या रिक्षाचालकाच्या वारसाला आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
अनोख्या आंदोलनात हनुमंत पडवळ, रिक्षाचालक कांबळे व रघुनाथ सपकाळ तसेच पुढील सीटवर सिद्धनाथ लोमटे, रेणापूर येथील रिक्षाचालक गणेश नागमोडे, डिगांबर घोडके, संजय काळे ज्ञानेश्वर सिंपाळे, बाबा सिकलकर, नुरखाँ पठाण, नयूम शेख लातूर येथील विनोद मोरे, बालाजी बारबोले, भोकरे, गंगणेसह अनेक रिक्षाचालक सहभागी झाले होते, या तीनचाकी सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.]