शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आईला भेटून सासरी निघालेल्या मुलीच्या दुचाकीला ट्रकची जाेरदार धडक; जावई ठार

By राजकुमार जोंधळे | Updated: October 11, 2023 18:40 IST

मुलगी गंभीर : लातूर-नांदेड महामार्गावरील घटना...

चाकूर / वडवळ (जि. लातूर) : आईला भेटून गावाकडे निघालेल्या मुलीच्या दुचाकीला लातूर-नांदेड महामार्गावरील घरणी उड्डाणपुलानजीक ट्रकने जाेराची धडक दिली. या अपघातात जावई आणि मुलगी गंभीर जखमी झाले. उपचारासाठी दाेघांनाही लातूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. दरम्यान, उपचारादरम्यान जावयाची प्राणज्याेत मालवली. हा अपघात दुपारी ३:४५ वाजण्याच्या सुमारास घडला. हा अपघात एवढा भीषण हाेता की, ट्रकने दुचाकीला २० फुटांपर्यंत फरफटत नेले.

चाकूर तालुक्यातील घरणी उड्डाणपुलानजीक रस्त्यावर ट्रक-दुचाकीचा दुपारी ३:४५ वाजता अपघात झाला. या अपघातात लातूर येथून नांदेडकडे ट्रक (एम.एच. २६ बी.ई. ३६४९) निघाला हाेता. दरम्यान, सासरवाडी वडवळ नागनाथ येथून भीमाशंकर मुळे (वय ५०) आणि पत्नी अनिता मुळे (४२, दोघे रा. चांभरगा) हे मंगळवारी दुपारी दुचाकीवरून (एम.एच.२४ ए.सी. ३६०१) नळेगावकडे जात हाेते. लातूर-नांदेड महामार्गावरील घरणी उड्डाणपुलाच्या बोगद्यातून जाताना लातूरकडून येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जाेराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दाेघेही रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या दुचाकीला ट्रकने जवळपास २० फुटांपर्यंत फरफटत नेले. यामध्ये दाेघेही गंभीर जखमी झाले. दोघांच्या पायाला जबर मार लागला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, पोहेकॉ. ईश्वर स्वामी, रितेश आंधुरकर यांनी अपघातस्थळी भेट दिली. जखमींना तातडीने चाकूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथील डाॅक्टरांनी प्राथमिक उपचार करून, पुढील उपचारासाठी त्यांना लातूरला पाठवले. मात्र, उपचारादरम्यान भीमाशंकर मुळे यांची प्राणज्याेत मालवली, तर जखमी अनिता मुळे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सासरवाडी येथून ते निघाले हाेते गावाकडे...वडवळ नागनाथ हे अनिता मुळे यांचे माहेर आहे. त्या मंगळवारी पतीसह आईला भेटण्यासाठी दुचाकीवरून आल्या हाेत्या. दरम्यान, दुपारी ३:४५ वाजण्याच्या सुमारास वडवळ येथून आपल्या गावाकडे निघाले हाेते. दरम्यान, घरणी उड्डाणपुलानजीक ट्रकने त्यांच्या दुचाकीला जाेराची धडक दिली. यामध्ये अनिता मुळे आणि भीमाशंकर मुळे हे दाेघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी लातूरला पाठविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान जावई भीमाशंकर मुळे यांची प्राणज्याेत मालवली.

टॅग्स :AccidentअपघातlaturलातूरDeathमृत्यू