शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यात उभ्या काळी-पिवळी जीपवर पाठीमागून टेंम्पो धडकला; अपघातात चौघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 13:54 IST

धडक एवढी जोरात होती की अपघात होताच काळी - पिवळी रस्त्याच्या बाजूला जाऊन खड्डयात पडली.

- संदीप अंकलकोटेचाकूर/ आष्टामोड (जि. लातूर) : प्रवाश्यांची चढउतार करण्यासाठी उभी असलेल्या काळी - पिवळी जीपला पाठीमागून येणाऱ्या टेंम्पोने जोरात धडक दिल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता चाकूर तालुक्यातील   महाळंग्रापाटी येथे घडली. या अपघातात चौघे जण जखमी झाले आहेत.

महाळंग्रापाटी येथे काळी-पिवळी जीप क्र एम.एच. २४ एफ ३४६२ ही लातूरकडून चाकूरकडे येत होती. त्यातील प्रवाश्यांची चढउतार करण्यासाठी महाळंग्रापाटी येथे रस्त्यावर थांबली होती. दरम्यान यावेळी टेंम्पो क्रमांक एम.एच. २२ व्ही.एन.३१३५ लातूरहून चाकूरकडे जात होता. त्यावेळी टेंम्पोची काळी- पिवळीला पाठीमागून जोरदार धडक बसली. त्यात दोन्ही वाहनाचे चालक व जीपमधील दोघे असे चौघेजण जखमी झाले.

काळी - पिवळीचा चालक संगमेश्वर खांडेकर तर टेंम्पोचा चालक अंकूश भोसले आणि जीपमधील प्रवाशी नामदेव जाधव, मैना जाधव अशी जखमींची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी लातूरला पाठविण्यात आले आहे. धडक एवढी जोरात होती की अपघात होताच काळी - पिवळी रस्त्याच्या बाजूला जाऊन खड्डयात पडली. तर टेंम्पो रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन पडला. अपघात ऐन पाटीनजिक झाल्याने तेथे दुभाजक नसल्याने टेम्पो उजव्या बाजूला खड्ड्यात जाऊन पडला.

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूर