शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधातून एकास कोयत्याने तोडले; दुसऱ्याच दिवशी सहआरोपी महिलेने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 11:51 IST

करकट्टा शिवारात भर दिवसा एकाचा खून झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली होती. मुरुड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

मुरुड (जि. लातूर) : अनैतिक संबंधातून कोयत्याने वार करून करकट्टा शिवारात एका ४० वर्षीय व्यक्तीचा खून केल्याची घटना रविवारी (दि. ३०) घडली होती. या प्रकरणात सहआरोपी असलेल्या महिलेने सोमवारी सकाळी करकट्टा शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, याबाबत मुरुड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले, करकट्टा शिवारात रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शरद प्रल्हाद इंगळे (४०) याचा ऊस तोडण्याच्या कोयत्याने गळ्यावर वार करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी पाचजणांवर कलम १०३, ६१(२), ३(५) बीएनएसप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील रोहन ऊर्फ सोनट्या बाळासाहेब शिंदे यास अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे, तर उर्वरित तीन आरोपींना पोलिसांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सहआरोपी असलेल्या महिलेने सोमवारी सकाळी करकट्टा शिवारातील वनविभागाच्या जंगलात असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेतल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी प्रेत उत्तरीय तपासणीसाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात पाठविले असून, आत्महत्येप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद मुरुड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

पोलिसांकडून तपास सुरूखून प्रकरणात सहआरोपी असलेल्या महिलेने आत्महत्या का केली, का तिचा घातपात केला या अनुंषगानेही मुरुड पोलिस तपास करीत आहे. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेशकुमार राऊत, सहायक पोलिस निरीक्षक अशोक उजगरे, सहायक पोलिस निरीक्षक हाडबे, पोलिस उपनिरीक्षक नागरगोजे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली घटनेची माहितीवनविभागातील अधिकारी, कर्मचारी करकट्टा शिवारात वन पाहणीसाठी गेले असता लिंबाच्या झाडाला एका महिलेने गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिस घटनास्थळी पोहोचले असता आत्महत्या केलेली महिला खून प्रकरणातील सहआरोपी असल्याचे समोर आले, अशी माहिती तपासी अधिकारी हाडबे यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर