लातूर / औसा : दरोड्याच्या तयारीत असलेल्या बीड जिल्ह्यातील पाचजणांच्या सराईत टाेळीला रविवारी पहाटे घातक शस्त्रासह जेरबंद केले. ही कारवाई औसा-भादा पाेलिसांनी केल्याचे अप्पर पाेलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी रविवारी सायंकाळी औसा येथे घेतलेल्या पत्रपरिषेदत सांगितले.
पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखा, औसा, किल्लारी, भादा, रेणापूर, चाकूर, अहमदपूर येथील अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेतली. रात्रीच्या वेळी सतर्क पेट्रोलिंग आणि नाकाबंदीचे आदेश दिले. रात्रीच्या गस्तीत स्थानिक नागरिकांनाही सामावून घेण्याच्या सूचना केल्या. रविवारी पहाटे गस्त सुररू असताना औसा आणि भादा येथील पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना नागरिकांनी माहिती दिली. शिवलीमोड आणि सिंधाळा येथे एक चारचाकी वाहन औसा-तुळजापूर महामार्गावर संशायास्पद फिरत आहे. याच्या आधारे औसा, भादा पाेलिसांनी ते वाहन शिवलीमोड परिसरातून ताब्यात घेतले. वाहनातील पाचजणांना ताब्यात घेतले. मात्र, तिघांनी अंधाराचा फायदा घेत पलायन केले. पाचजणांची चाैकशी केली असता, रिहान मुस्तफा शेख (वय २०), अन्वरखॉ जलालखॉ पठाण (२४), हफिज मुमताजोददीन शेख (३६, तिघेही रा. परळी), सादेक मोहम्म्द यासिन मोहम्मद (४४) आणि फारुख नबी शेख (२७, दाेघेही रा. बीड) अशी नावे सांगितली.
काेयता, धारदार शस्त्रासह आठ लाखांचा मुद्देमाल जप्तयावेळी टेम्पोची (एम.एच. ४४ यू. ३२९८) झडती घेतली असता, दरोडासाठी लागणारे साहित्य, कोयता, धारदार चाकू, दोन दांडके, लोखंडी पार, दाेन कटावणी, रॉड, पाईप, बनावट नंबर प्लेट, चार माेबाईल आणि टेम्पाे असा ७ लाख ७१ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत भादा ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, सपोनि महावीर जाधव तपास करीत आहेत.
स्थागुशा, औसा आणि भादा पाेलिसांकडून समांतर तपासही कारवाई पाेलिस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण, औसा डीवायएसपी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. सुनील रेजितवाड, सपाेनि. महावीर जाधव, पाेउपनि. भाऊसाहेब माळवदकर, रामकिशन गुट्टे, हानमंत पडिले, जमादार, मौला बेग, दत्तात्रय तुमकुटे, फड, योगेश भंडे, सचिन गुंड, भागवत गोमारे, सूर्यकांत मगर, प्रकाश राठोड, संदीप राठोड यांच्या पथकाने केली. गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. सुधाकर बावकर यांची पथके करीत आहेत.