कर्जबाजारीपणास कंटाळून शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल; शेतात संपवले जीवन

By संदीप शिंदे | Published: February 1, 2024 06:14 PM2024-02-01T18:14:46+5:302024-02-01T18:15:02+5:30

खरीप आणि रबी हंगामात अपेक्षित उत्पन्न आले नसल्याने कर्ज कसे फेडणार या विवंचनेत उचलले टोकाचे पाऊल

A farmer ended his life in Chachur taluk after being fed up with debt | कर्जबाजारीपणास कंटाळून शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल; शेतात संपवले जीवन

कर्जबाजारीपणास कंटाळून शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल; शेतात संपवले जीवन

चापोली : चाकूर तालुक्यातील आनंदवाडी येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणास कंटाळून बुधवारी स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. कालिदास बाबुराव पासमे असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, याबाबत चाकूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आनंदवाडी येथील शेतकरी कालिदास पासमे (वय ५८) यांची आनंदवाडी शिवारात जमीन असून, त्यांनी बँकाकडून कर्ज घेतले होते. गत काही दिवसांपासून कर्ज वसुलीसाठी बँकेचा तगादा लागला होता. खरीप आणि रबी हंगामात अपेक्षित उत्पन्न आले नसल्याने कर्ज कसे फेडणार या विवंचनेत ते होते. त्यामुळे त्यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, चाकूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, चापोली प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. तर गुरुवारी दुपारी शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत कालिदास पासमे यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: A farmer ended his life in Chachur taluk after being fed up with debt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.