शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकनंतर ७२ लाखांची ९०० बॉक्स विदेशी दारूही सापडली; गुन्हे शाखेकडून दरोडखोरांना अटक

By राजकुमार जोंधळे | Updated: May 16, 2024 19:09 IST

सिनेस्टाईल पद्धतीने ७२ लाखाच्या दारुचा ट्रक पळविणाऱ्यांना उचलले, लातुरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

लातूर : नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथील कारखान्यातून ७२ लाखांची विदेशी दारूचे बॉक्स घेऊन कोल्हापूरकडे निघालेला ट्रक चाकूर ते बोरगाव काळे दरम्यान चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली होती. यातील दरोडेखोरांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी धाराशीव जिल्ह्यातून  मुसक्या आवळल्या आहेत. 

पोलिसांनी सांगितले, धर्माबाद येथून कोल्हापूरकडे निघालेल्या विदेशी दारुचा ट्रक चाकूर ते आष्टामोड दरम्यान जीप आडवी लावून थांबविला. यावेळी चार ते पाच जणांना ट्रकमध्ये घुसखोरी केली. यावेळी चालकासह इतरांना चाकूचा धाक दाखवून स्टेअरिंगवर ताबा मिळवला. यावेळी दरोडेखोरांनी त्यांच्यावर चादर टाळली. हा ट्रक तसाच बार्शी महामार्गावरील बोरगाव काळे येथे आणला. ट्रकमधील चालकासह इतरांना खाली उतवण्यास सांगितले. यावेळी महामार्गालगतच्या शेतात दोरखंड, शर्टने हातपाय बांधले. त्यानंतर तो ट्रक दारुसह पळविला. याबाबत चाकूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

तुळजापूर-सोलापूर महामार्गावर पोलिसांना सापडला रिकामा ट्रक...हा ट्रक तुळजापूर-धाराशिव महामार्गावरील तामलवाडी नजीक १२ मे रोजी सापडला. मात्र, यातील दारुचे बॉक्स लंपास करण्यात आले होते. दरम्यान, गुन्हा दाखल होताच जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. गुन्ह्याच्या तपासकामी स्थानिक गुन्हे शाखा आणि चाकूर पोलीस ठाणे यांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली होती.

रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारांचीपोलिसांकडून झाली झाडाझडती...स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीड, धाराशिव, सोलापूर व कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे तपास करून अशा पद्धतीचे गुन्हे करणाऱ्या सराईत आरोपींना ताब्यात घेत कसून चौकशी केली. तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेतला. त्यांना धाराशिव जिल्ह्यातून तातडीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात लुटलेल्या विदेशी दारूचे ९०० बॉक्स आणि ट्रक असा एकूण ७२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थागुशा, सायबर क्राईम शाखेने ७२ तासात गुन्ह्याचा लावला छडा...ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, सपोनि. विश्वंभर पल्लेवाड, सपोनि. प्रवीण राठोड, पोउपनि.  संजय भोसले, रियाज सौदागर, राजेश कंचे, योगेश गायकवाड, प्रदीप स्वामी, राहुल कांबळे, रामहरी भोसले, मनोज खोसे, खुर्रम काझी, राहुल सोनकांबळे, साहेबराव हाके, दीनानाथ देवकते, रवी गोंदकर, तुराब पठाण, नितीन कटारे,मोहन सुरवसे, संतोष खांडेकर, चालक नकुल पाटील, सचिन मुंडे, प्रदीप चोपणे, चंद्रकांत केंद्रे, व्यंकट निटुरे यांच्या पथकाने ७२ तासात केली. यामध्ये सायबर सेलचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नलिनी गावडे, संतोष  देवडे, गणेश साठे, शैलेश सुडे यांनी महत्वाची भूमिका बजवल आहे.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी