८८ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:14 IST2021-05-03T04:14:58+5:302021-05-03T04:14:58+5:30
वलांडी : वलांडी येथील एका ८८ वर्षीय व्यक्तीस कोरोनाची लागण झाली. दरम्यान, त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यामुळे त्यांनी कोरोनावर ...

८८ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात
वलांडी : वलांडी येथील एका ८८ वर्षीय व्यक्तीस कोरोनाची लागण झाली. दरम्यान, त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यामुळे त्यांनी कोरोनावर मात केली असून त्यांची प्रकृती ठणठणीत झाली आहे.
सध्या देवणी तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. वलांडी येथील जाफरसाब सौदागर यांना २१ एप्रिल रोजी कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. त्यामुळे त्यांची उदगीरातील खाजगी रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्यानंतर तेथील डॉक्टरांनी गोळ्या औषधी देऊन गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला.
ते गृहविलगीकरणात असताना अचानक प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना तात्काळ लातुरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जाफरसाब सौदागर यांना सहा मुले असून ती पदवीधर आहेत. त्यातील तीन मुले शासकीय सेवेत आहेत. या सर्वांचे वय ५० पेक्षा जास्त असल्याने सौदागर यांनी डॉक्टर नातू असलेल्यास आपल्याकडे बोलावून घेतले. त्या नातवाने त्यांची रुग्णालयात सेवा केली. औषधोपचाराबरोबर सकस आहार दिला. त्यामुळे सौदागर यांनी कोरोनावर मात केली आहे.
तात्काळ उपचार घ्या...
कोरोनाची लक्षणे जाणवू लागताच आवश्यक त्या चाचण्या करून घ्याव्यात. तसेच डॉक्टरांनी सांगितलेले सल्ले व औषधोपचार वेळेवर करावेत. त्यामुळे कोरोनावर निश्चित मात करता येते, असे जाफरसाब सौदागर यांनी सांगितले.