उदगीरात नव्याने ८८ कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:25 IST2021-04-30T04:25:06+5:302021-04-30T04:25:06+5:30
येथील कोविड रुग्णालयात गुरुवारी आरटीपीसीआर तपासणीत ३९, ॲन्टीजन तपासणीमध्ये ४५ बाधित आढळले. इतर ठिकणाहुन चार जणांना उपचारासाठी दाखल करण्यात ...

उदगीरात नव्याने ८८ कोरोना बाधित
येथील कोविड रुग्णालयात गुरुवारी आरटीपीसीआर तपासणीत ३९, ॲन्टीजन तपासणीमध्ये ४५ बाधित आढळले. इतर ठिकणाहुन चार जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. यशस्वी उपचारानंतर १५ जणांना घरी सोडण्यात आले. कोरोना बाधित ५, नॉन कोविड ४ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
सध्या कोविड रुग्णालयात ७६, होम आयसोलेशनमध्ये ९३, तोंडार पाटी येथील कोविड केअर सेंटर येथे ४५, डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर संस्थेत २४, पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे २६, तोंडार पाटी येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर येथे ३७, जयहिंद मुलांचे वस्तीगृह येथे २० आणि खाजगी कोविड रुग्णालयात ३५ अशा एकूण ३५६ बाधितांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतिश हरिदास यांनी दिली.