जिल्ह्यात आढळले ८३ बाधित; बरे होऊन घरी परतले ८२ जण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:20 IST2021-03-10T04:20:33+5:302021-03-10T04:20:33+5:30
बहूतांश रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार... जिल्ह्यात सद्यस्थितीत ७६१ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी ४९३ रुग्ण गृहविलगीकरणात आहे. उर्वरित २६८ रुग्ण ...

जिल्ह्यात आढळले ८३ बाधित; बरे होऊन घरी परतले ८२ जण
बहूतांश रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार...
जिल्ह्यात सद्यस्थितीत ७६१ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी ४९३ रुग्ण गृहविलगीकरणात आहे. उर्वरित २६८ रुग्ण रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये दाखल आहेत. बहूतांश रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेण्यास पसंती देत आहेत. दरम्यान मंगळवारी होमआयसोलेशनमधील ६७ जण बरे झाल्याने त्यांना सुटी मिळाली. विलासराव देशमुख शासकीय संस्थेतील ५, सामान्य रुग्णालय उदगीर येथील १, बारा नंबर पाटी वसतीगृहातील ४ आणि खाजगी रुग्णालयातील ५ अशा एकूण ८२ जणांची प्रकृती ठणठणीत झाली.
पॉझिटिव्ही रेट वाढतोय...सतर्कता बाळगा...
रॅपिड ॲन्टीजन टेस्टमधला पॉझिटिव्हीटी रेट ८.४ तर प्रयोगशाळेतील चाचणीतील पॉझिटिव्हीटी रेट ४.९ आहे. जो या पुर्वी २.५ ते ३.५ टक्क्यांपर्यंत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यात थोडी वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे. मास्क वापरणे, फिजीकल डिस्टन्स पाळणे आणि वारंवार हात धुणे या त्रिसुत्रीची अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.