उदगीर कोविड रुग्णालयात ७४ रुग्ण दाखल, दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:19 IST2021-03-26T04:19:56+5:302021-03-26T04:19:56+5:30
गुरुवारी येथील कोविड रुग्णालयात आरटीपीसीर तपासणीत ५० जण कोरोना बाधित आढळले. ॲन्टीजन तपासणीमध्ये २१ जण कोरोनाबाधित आढळले. इतर ठिकाणाहून ...

उदगीर कोविड रुग्णालयात ७४ रुग्ण दाखल, दोघांचा मृत्यू
गुरुवारी येथील कोविड रुग्णालयात आरटीपीसीर तपासणीत ५० जण कोरोना बाधित आढळले. ॲन्टीजन तपासणीमध्ये २१ जण कोरोनाबाधित आढळले. इतर ठिकाणाहून ३ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. उदगीर येथील समतानगर भागातील ६६ वर्षीय महिलेचा व कर्नाटकातील भालकी तालुक्यातील ५० वर्षीय पुरुषचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण ९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या येथील कोविड रुग्णालयात ४८ रुग्णांवर आणि होम आयसोलेशनमध्ये १३२ तर तोंडार पाटी येथील कोविड केअर सेंटर येथे ३३, डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर येथे ३ असे एकूण २१६ कोरोना बाधितांवर उपचार चालू आहेत, अशी माहिती कोविड रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. शशीकांत देशपांडे यांनी दिली. प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. तसेच फिजिकल डिस्टन्स राखावा, असे आवाहनही त्यांनी केले.