एकुर्कात ७२ ॲक्टिव्ह बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:18 IST2021-04-14T04:18:13+5:302021-04-14T04:18:13+5:30

तालुक्यात कोरोनाचा आलेख उंचावत आहे. त्यामुळे नागरिकांत धास्ती पसरली आहे. आरोग्य विभागाकडून सेवा देण्याबरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जात ...

72 active disrupted in Ekurka | एकुर्कात ७२ ॲक्टिव्ह बाधित

एकुर्कात ७२ ॲक्टिव्ह बाधित

तालुक्यात कोरोनाचा आलेख उंचावत आहे. त्यामुळे नागरिकांत धास्ती पसरली आहे. आरोग्य विभागाकडून सेवा देण्याबरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जात आहे. सध्या जळकोट शहरात ८६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. एकुर्का गावात ७२, वांजरवाड्यात ३६, केकतसिंदगी येथे ४५ कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे या चारीही गावांत कोरोना चाचण्या वाढविण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.

तालुक्यात आतापर्यंत १ हजार २४ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यातील ६५० जण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या ३५१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. कोराेनामुळे २३ जणांचा मृत्यू झाला आहे. होम आयसोलेशनमध्ये २८७ जण उपचार घेत आहेत. २९ जणांना उदगीर, लातूरला रेफर करण्यात आले आहे. २७ जण कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहे, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जगदीश सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार, डॉ. सचिन सिद्धेश्वरे यांनी दिली.

Web Title: 72 active disrupted in Ekurka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.