लातूर तालुक्यात ६२ ग्रामपंचायतीसाठी १ हजार ३२९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. औसा तालुक्यात ४५ ग्रामपंचायतीसाठी ९१५, रेणापूर तालुक्यात २७ ग्रा.पं.साठी ४७३, निलंगा तालुक्यात ४४ ग्रा.पं.साठी १२३, देवणी तालुक्यात ३१ ग्रा.पं.साठी ४९०, अहमदपूर ४२ ग्रा.पं.साठी ७०९, चाकूर २२ ग्रा.पं.साठी ४७९, उदगीर तालुक्यात ६१ ग्रा.पं.साठी ११९१, जळकोट तालुक्यात २७ ग्रा.पं.साठी ४८९ आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यात २७ ग्रा.पं.साठी ४७६ असे एकूण ३८३ ग्रा.पं.साठी ७ हजार २८६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत.
२ हजार २३९ जणांनी घेतली माघार
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ४ जानेवारी रोजी होती. या मुदतीत २ हजार २३९ जणांनी माघार घेतली. लातूर तालुक्यात ४२४, औसा २४९, रेणापूर १२३, निलंगा २३९, देवणी २०६, अहमदपूर २५५, चाकूर १४५, उदगीर ३३२, जळकोट १४८, शिरूर अनंतपाळ ११८ अशा एकूण २ हजार २३९ जणांनी शेवटच्या दिवशी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली.
चिन्हांचे झाले वाटप
निवडणूक आयोगाने या निवडणुकीसाठी १९० चिन्ह प्रसिद्ध केले आहेत. त्यापैकी आवडीच्या पाच चिन्हांमधून एकाची निवड उमेदवाराला करता येणार होती. यंदा ५० चिन्ह नव्याने आयोगाने समाविष्ट केली आहेत. या चिन्हांमधून उमेदवारांनी चिन्ह निवडले आहेत. त्यामुळे आता प्रचाराला गती येणार आहे.